Wednesday 22 August 2018

सटर फटर


तू गुलाब मी काटा, मी चपाती तू आटा

तू केस मी बटा, मी खोबरेल तू जटा

तू पाणी मी लाट, मी आलू तू चाट

तू खरी मी खोटा, मी झारी तू लोटा.

सांग तुझ्याशिवाय कशा कटणार आयुष्याच्या या काटेरी वाटा ?


मी ताट तू वाटी, मी खडू तू पाटी

मी दगड तू गोटी, मी कमंडलू तू लोटी !

मी वस्तरा तू धोपटी, मी नळ तू तोटी

मी 'खंबा' तू चपटी, मी थकवा तू काठी

संसारात तुझ्या माझ्या लाभावीत फळे लागतील का रसाळ गोमटी ?.


तू मेथी मी पालक, तू वाहन मी चालक

तू काच मी लोलक, तू घुंगरू मी ढोलक

तू अंडे मी बलक, तू सूचना मी फलक

तू लाल मी भडक, तू खाण मी खडक

तुझ्या भोळ्या प्रेमाची, नेहमीच बसेल का अशी धडक ?


मी क्रोसिन तू फिव्हर, मी पुस्तक तू कव्हर

मी मोबाईल तू टॉवर, मी न्हाणी तू शॉवर

मी नॅनो तू जॅग्वार, मी सुरा तू तलवार

मी रताळे तू गाजर, मी तलाव तू पाझर

ठाऊक आहे तुला ? प्रेमात आपल्या तरेल साराच भवसागर !


मी नारळ तू करवंटी, मी पळी पंचपात्र तू घंटी

मी पोहे तू पुरचुंडी, मी झोका तू घसरगुंडी

मी बुशशर्ट तू गुंडी, मी त्रिशूळ तू चामुंडी

मी कानामात्रा तू वेलांटी, मी कण्हेर तू कोरांटी

मिळेल त्या झाडावर घालायची का आपल्या संसाराची घरटी ?


मी सीपीयू तू मॉनिटर, मी रिबन तू प्रिंटर

मी गुड तू बेटर, मी लव्ह तू लेटर

मी रेनफॉंल तू शेल्टर, मी कोरा तू आल्टर

मी  गॅरेज तू फिटर, मी लायर तू चीटर

प्रिये तुझ्या मधाळ प्रेमापुढे सारी दुःखे होतात सटर फटर !


- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...