Tuesday 13 March 2018

स्मृती ...

भाकरीचा अष्टगंध शोधताना
पाय कधी छिलून गेले काही कळलेच नाही,
बाहेर लखलखता प्रकाश झिरपताना
काळजात अंधारले कधी कळलेच नाही.
जन्म देणारे टाकून गेले आकाशाच्या बाप्पाकडे,
गाऱ्हाणे गायचे कसे कळलेच नाही.
हरेक क्षण चिणलेत मेंदूच्या कपारींमध्ये,
स्मृतींना चुकवायचे कसे कळेलेच नाही...   

- समीर गायकवाड 

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...