आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कलेवर
गावकऱ्यांनी लिंबाच्या झाडावरून उतरवलेय खरे,
मात्र तरीही त्याच बांधावर, त्याच झाडावर, त्याच फांदीवर
शेतकऱ्याच्या समस्या फासावर लटकून आहेत!
कितीही कलेवरे उतरवली तरी
फास काही केल्या रिता राहत नाहीये....
मुक्तछंद
समीर गायकवाडच्या कविता
Friday, 2 October 2026
Friday, 11 September 2026
लेखणीच्या लक्ष जिभांनी
रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी
नंतर जे ते आपल्या कोषात रममाण झाले..
भूमिका बदलायला पाहिजेत
क्रांतीवर खुडुक साहित्य लिहिणाऱ्याचेही
त्याच्या वाट्याचं सुखमौनी आभाळ
मग कवितेस तलवारीची तेजतर्रार धार येईल
आणि लेखणीच्या लक्ष जिभांनी विद्रोहाचा लाव्हा
आंदोलनकर्त्यांचे नेभळं आभाळ पेटवून देईल!
- समीर गायकवाड
आभाळ विकायला काढले
तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या
रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्या जीवांनी
रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्या जीवांनी
काही वेळ याचाही आनंद घेतला
नंतर जे ते आपल्या कोषात रममाण झाले..
भूमिका बदलायला पाहिजेत
क्रांतीवर खुडुक साहित्य लिहिणाऱ्याचेही
रक्त वाहायला हवे
त्याच्या वाट्याचं सुखमौनी आभाळ
विद्रोह्यांच्या वाट्यास आले पाहिजे
मग कवितेस तलवारीची तेजतर्रार धार येईल
आणि लेखणीच्या लक्ष जिभांनी विद्रोहाचा लाव्हा
आंदोलनकर्त्यांचे नेभळं आभाळ पेटवून देईल!
- समीर गायकवाड
Thursday, 30 July 2026
अंतिम स्मृती..
कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत
तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील
स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय
त्यांची खूप मदत झालीय, त्यांचे ऋण मानले पाहिजे
अगणित स्मृती आहेत
आस्ते कदम एकेक आठवण विरत जाईल
साऱ्या स्मृती हळूहळू लोप पावतील
त्यावेळी माझी फक्त एकच इच्छा असेल
अखेरच्या श्वासापर्यंत एकतरी स्मृती सचेत असावी
सर्वात शेवटी पुसली जाणारी आठवण ती असावी,
ज्या क्षणी आपण दोघे पहिल्यांदा भेटलो होतो...
- समीर गायकवाड
तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील
स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय
त्यांची खूप मदत झालीय, त्यांचे ऋण मानले पाहिजे
अगणित स्मृती आहेत
आस्ते कदम एकेक आठवण विरत जाईल
साऱ्या स्मृती हळूहळू लोप पावतील
त्यावेळी माझी फक्त एकच इच्छा असेल
अखेरच्या श्वासापर्यंत एकतरी स्मृती सचेत असावी
सर्वात शेवटी पुसली जाणारी आठवण ती असावी,
ज्या क्षणी आपण दोघे पहिल्यांदा भेटलो होतो...
- समीर गायकवाड
Monday, 13 July 2026
अर्थांच्या शोधातली अक्षरे
ज्यांना कुणी आवाज दिला नाही
ज्यांनी कुणावर प्रेम केलं नाही
ज्यांची रोजीरोटी कुणीतरी हिसकावून घेतली
ज्यांच्या वाट्याच्या बिछान्यावर
दुसऱ्याचीच पावले पडली
ज्यांच्या पत्रांना कुणी उत्तरेच
पाठवली नाहीत
ज्यांचे फोन कॉल्सच कुणी रिसिव्ह केले नाहीत
अशी माणसं, गरज पडल्यावर
कुणालाच आवाज देत नाहीत
प्रेम होण्यापासून स्वतःला
वाचवत फिरतात
छोट्याश्या कारकुनीत वा गाढवमेहनतीत
देखील त्यांना सत्ता असल्यागत वाटू लागते
आपलं अंथरूण मोठं झालं तरी
आपले पाय पसरून झोपत नाहीत
पत्र पाठवायचं कसब विसरून जातात
ते फोनही करत नाहीत
कॉन्टॅक्ट लिस्टमधील महत्वाच्या नंबर्सना देखील
ते कॉल करत नाहीत
ते नुसते पाहत राहतात,
श्वास उच्छवास घेत राहतात
बऱ्याच काळानंतर, एके दिवशी
त्यांच्या फोनवर एक कॉल येतो
बराच वेळ रिंग येत राहते
कॉल उचलला जात नाही
पुन्हा पुन्हा रिंग येत राहते
तरीही कॉल उचलला जात नाही
न राहवून समोरची व्यक्ती कॉन्टॅक्ट लिस्ट अपडेट करते
एक नाव यादीतून कमी होते
एक नंबर डिलिट केला जातो
एक नोंद स्मृती पटलांमध्ये ढकलली जाते
ब्लॅंक झालेला फोन
बरेच दिवस ड्रॉवरमध्ये पडून राहतो
काही दिवसांनी त्या घराचा व्यवहार होतो
घर साफ करताना ड्रॉवरमधले सामान सुमान बाहेर काढले जाते
त्यात पडून असलेला आऊटडेटेड हँडसेट डस्टबिनमध्ये जातो
त्याच्या खालचा कागदाचा कपटा
वाचण्याची कुणी तसदी घेत नाही
त्यावर लिहिलं होतं,
'एखादाच जॉर्ज ऑरवेल असतो
ज्याला लाभलेली असते इलीन!
बाकी सारी असतात अक्षरे
अर्थांच्या शोधात भरकटलेली
कुणाशीही कनेक्ट न झालेली....'
- समीर गायकवाड
ज्यांनी कुणावर प्रेम केलं नाही
ज्यांची रोजीरोटी कुणीतरी हिसकावून घेतली
ज्यांच्या वाट्याच्या बिछान्यावर
दुसऱ्याचीच पावले पडली
ज्यांच्या पत्रांना कुणी उत्तरेच
पाठवली नाहीत
ज्यांचे फोन कॉल्सच कुणी रिसिव्ह केले नाहीत
अशी माणसं, गरज पडल्यावर
कुणालाच आवाज देत नाहीत
प्रेम होण्यापासून स्वतःला
वाचवत फिरतात
छोट्याश्या कारकुनीत वा गाढवमेहनतीत
देखील त्यांना सत्ता असल्यागत वाटू लागते
आपलं अंथरूण मोठं झालं तरी
आपले पाय पसरून झोपत नाहीत
पत्र पाठवायचं कसब विसरून जातात
ते फोनही करत नाहीत
कॉन्टॅक्ट लिस्टमधील महत्वाच्या नंबर्सना देखील
ते कॉल करत नाहीत
ते नुसते पाहत राहतात,
श्वास उच्छवास घेत राहतात
बऱ्याच काळानंतर, एके दिवशी
त्यांच्या फोनवर एक कॉल येतो
बराच वेळ रिंग येत राहते
कॉल उचलला जात नाही
पुन्हा पुन्हा रिंग येत राहते
तरीही कॉल उचलला जात नाही
न राहवून समोरची व्यक्ती कॉन्टॅक्ट लिस्ट अपडेट करते
एक नाव यादीतून कमी होते
एक नंबर डिलिट केला जातो
एक नोंद स्मृती पटलांमध्ये ढकलली जाते
ब्लॅंक झालेला फोन
बरेच दिवस ड्रॉवरमध्ये पडून राहतो
काही दिवसांनी त्या घराचा व्यवहार होतो
घर साफ करताना ड्रॉवरमधले सामान सुमान बाहेर काढले जाते
त्यात पडून असलेला आऊटडेटेड हँडसेट डस्टबिनमध्ये जातो
त्याच्या खालचा कागदाचा कपटा
वाचण्याची कुणी तसदी घेत नाही
त्यावर लिहिलं होतं,
'एखादाच जॉर्ज ऑरवेल असतो
ज्याला लाभलेली असते इलीन!
बाकी सारी असतात अक्षरे
अर्थांच्या शोधात भरकटलेली
कुणाशीही कनेक्ट न झालेली....'
- समीर गायकवाड
Monday, 15 June 2026
लिलीची फुलं..

निघताना त्याने विचारलं, 'आता पुन्हा कधी भेट होईल की नाही ठाऊक नाही,
अखेरची गळाभेट तरी घेशील की नाही?'
इतका वेळ खाली नजर खिळवून असलेली ती,
त्याच्या या सवालाने भानावर आली
आलिंगन देण्यास तिने नकार दिला.
गहिऱ्या आवाजात त्याने पुन्हा एकदा विनंती केली,
गहिऱ्या आवाजात त्याने पुन्हा एकदा विनंती केली,
अखेरच्या मिठीसाठी!'
आता जर मिठी मारली नाही तर
हा क्षण पुन्हा येणार नाही
आणि हा सल मनात राहून जाईल,' तो म्हणाला.
डबडबलेल्या डोळ्यांनी नकार देत ती उत्तरली,
"निरोप घेताना सगळं मनासारखं झालं तर
तो निरोप कधीच लक्षात राहणार नाही,
मनात काही सल राहिला तर तो क्षण अखेरपर्यंत सोबत राहील..
येते मी.."
ती निघून गेली त्या दिशेने तो पाहत राहिला
तिचा आकार ठिपक्याएव्हढा झाला,
अंधार डोळ्यांत उतरला तेव्हा तोही निघाला.
त्या नंतर अनेक वर्षे तो अधून मधून त्या ठिकाणी यायचा.
शून्यात नजर लावून बसायचा.
अलीकडील काही महिन्यात तो दिसला नाही.
तिथे आता लिलीची सफेद फुलं मोठ्या प्रमाणात उगवली आहेत.
तिच्या कॉफीनवरतीही तशीच फुलं होती..
- समीर गायकवाड
Sunday, 8 February 2026
तोडलेल्या झाडाचे प्रतिबिंब ..
दूर कुठे तरी एकट्याने मरून पडलेल्या
देहपंख विद्ध झालेल्या पक्षाच्या भिंगुळल्या डोळ्यात
बारकाईने
निरखून पाहिले तर
तोडलेल्या झाडांचे थिजलेले प्रतिबिंब दिसते.
__________________________
झाडं माणसासारखी कृतघ्न नसतात;
झाड कापण्यासाठी जे त्यांच्या छायेत येतात
त्यांनाही ते सावली देतात!
कृतघ्न तर माणूस असतो, जो स्वार्थासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो!
मुकी बिचारी झाडं कधी उलटून बोलत नाहीत,
पण एके दिवशी निसर्ग असं काही करून दाखवतो की
मग पश्चातापालाही वेळ मिळत नाही!
- समीर गायकवाड
झाड कापण्यासाठी जे त्यांच्या छायेत येतात
त्यांनाही ते सावली देतात!
कृतघ्न तर माणूस असतो, जो स्वार्थासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो!
मुकी बिचारी झाडं कधी उलटून बोलत नाहीत,
पण एके दिवशी निसर्ग असं काही करून दाखवतो की
मग पश्चातापालाही वेळ मिळत नाही!
- समीर गायकवाड
Wednesday, 17 December 2025
पूर्वी एक पक्षी गझल गायचा..
चार पाच झाडे ती ऐकत राहायची.
ज्यांच्या बद्दल बोललं जायचं,
ज्यांच्या बद्दल बोललं जायचं,
ती माणसंही मोजकीच असायची.
रात्र होताच फुल उमलायचे,
रात्र होताच फुल उमलायचे,
चौदिशांना सुंगंधाची नजर असायची...
आताशा सांज विलक्षण मौन असते,
आताशा सांज विलक्षण मौन असते,
वारा शोधित फिरतो झाडांना
विराणी खोल घुमते अंधारी,
विराणी खोल घुमते अंधारी,
पक्षांची ती गझल आता कशी ऐकायची?
Friday, 12 December 2025
वळणावरती झाड उभे..
घरट्यामधले पक्षी गाती सावलीच्या गीताला
भरदार बुंधा, हिरवी कोवळी पाने शेंड्याला
उनाड वारा अलगद झोंबतो नव्या कोंबाला
टक्क दुपारी जित्राब अज्ञात येते आसऱ्याला
भिंगुळली उन्हे रेंगाळती पानांच्या पदराला
अंगाई अंधाराची रात्रीस निजवते पानांला
स्वप्नी दिसे आर्तवन पानमिटल्या झाडांला
होता सुर्योदय पाने हसरी वंदिती विधात्याला
भुरळ झाडाच्या प्रेमाची नित्य पडते मातीला!
वळणावरती झाड उभे कलंडूनी आकाशाला
सावलीत निजे कुणी कुऱ्हाड घेऊनी उशाला
- समीर गायकवाड
Saturday, 6 December 2025
प्रिय बाबासाहेब!
एकदा का माणूस गेला की त्याला पुतळ्यात चिणतात.
त्याच्या विचारांना विशालकाय स्मारकात दफन करतात.
नुसताच उदोउदो करत महामानव नावाचं दंभसूक्त रचतात.
बाबासाहेब तरी याला कसे अपवाद राहतील?
उगाच ते या देशात जन्मले!
दलितांनी त्यांना अस्मितेच्या निळाईत बुडवले तर
उच्चवर्णीयांनी आपला पोटशूळ दडवत
दरसाली खोटा कुर्निसात केला.
Thursday, 4 December 2025
बायको आधी गेली की पुरुष खचतात
उतारवयात बायको आधी गेली की पुरुष पुरते खचतात.
ज्या पत्नीला मनसोक्त सहवास दिलेला नसतो
तिच्या आठवणींनी व्याकूळ होतात.
हरेक क्षणासाठी पस्तावत राहतात.
तिच्याविषयी त्यांना उघड बोलताही येत नाही,
नुसते घुसमटत जातात
उदास कसनुसे बसून राहतात
खिन्न कोरडं हसतात, इकडं तिकडं शून्यात नजर लावून बसतात
तिच्या चीजवस्तूंना लपून छपून हाताळतात,
तासंतास न्याहाळतात
आस्तिक असले तर देव्हाऱ्यातून बाहेर डोकवताना
आसवले डोळे पुसतात
जीवनातल्या सगळ्या लढाया थांबवत जातात
एका जागी राहणं अधिक पसंत करतात!
तिच्या आठवणींनी व्याकूळ होतात.
हरेक क्षणासाठी पस्तावत राहतात.
तिच्याविषयी त्यांना उघड बोलताही येत नाही,
नुसते घुसमटत जातात
उदास कसनुसे बसून राहतात
खिन्न कोरडं हसतात, इकडं तिकडं शून्यात नजर लावून बसतात
तिच्या चीजवस्तूंना लपून छपून हाताळतात,
तासंतास न्याहाळतात
आस्तिक असले तर देव्हाऱ्यातून बाहेर डोकवताना
आसवले डोळे पुसतात
जीवनातल्या सगळ्या लढाया थांबवत जातात
एका जागी राहणं अधिक पसंत करतात!
Sunday, 30 November 2025
शहरातील बेघर भिकारी
शहरातील बेघर भिकारी
रात्री रिकाम्या पोटी
धुळकट आडोशांना झोपी जातात.
दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात
रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे
म्हणून मनातल्या मनात दुवा मागतात...
भिकारी झोपी गेल्यानंतर तिथं चांदणं येतं,
दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात
रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे
म्हणून मनातल्या मनात दुवा मागतात...
भिकारी झोपी गेल्यानंतर तिथं चांदणं येतं,
त्यांच्या उशाला बसून कासावीस होतं..
रात्रीस आजकाल आभाळ निव्वळ निरभ्र दिसतं
कारण माझ्या वाट्याचं चांदणं विरतंय
शहरांतला काळोख रात्रभर रस्त्यांवर भटकत असतो
त्याचाही शोध तोच आहे जो माझा आहे...
- समीर गायकवाड
https://www.facebook.com/sameerbapu1/videos/524596562072041
रात्रीस आजकाल आभाळ निव्वळ निरभ्र दिसतं
कारण माझ्या वाट्याचं चांदणं विरतंय
शहरांतला काळोख रात्रभर रस्त्यांवर भटकत असतो
त्याचाही शोध तोच आहे जो माझा आहे...
- समीर गायकवाड
https://www.facebook.com/sameerbapu1/videos/524596562072041
Subscribe to:
Posts (Atom)
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कलेवर..
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कलेवर गावकऱ्यांनी लिंबाच्या झाडावरून उतरवलेय खरे, मात्र तरीही त्याच बांधावर, त्याच झाडावर, त्याच फांदीवर शेतक...
-
वाळूतले ठसे तुझे, केंव्हाच मिटून गेले पण देहाचा गंध अजुनी दरवळतो किनाऱ्यावर त्या गंधवेडापायी तर, समुद्रास भरती येत नसेल ना ? तुला भेटलो...
-
रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती. त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा ते थकलेले जीव निद्राधीन...
-
पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शि...
-
कालच तुझ्या शहरात जोरदार पाऊस पडलाय. मेघांना विचारलंस का, की ते कुठून आले होते ? पावसात चिंब भिजतानाची तुझी तस्वीर घेऊन मेघ सकाळीच परतले...
-
वेळ मिळताच मी बागेत चक्कर टाकून येत असतो. अलीकडेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपण दोघं ज्या बाकावर बसायचो, नेमक्या त्याच बाकावर आता एक तरत...



