Thursday, 30 July 2026

अंतिम स्मृती..

कालमानपरत्वे माझ्या सर्व स्मृती नष्ट होणार आहेत
तसे तर आपल्या सर्वांच्याच स्मृती नष्ट होतील

स्मृतींच्या आधारे इथंपर्यंत आलोय
त्यांची खूप मदत झालीय, त्यांचे ऋण मानले पाहिजे

अगणित स्मृती आहेत
आस्ते कदम एकेक आठवण विरत जाईल
साऱ्या स्मृती हळूहळू लोप पावतील

त्यावेळी माझी फक्त एकच इच्छा असेल
अखेरच्या श्वासापर्यंत एकतरी स्मृती सचेत असावी

सर्वात शेवटी पुसली जाणारी आठवण ती असावी,
ज्या क्षणी आपण दोघे पहिल्यांदा भेटलो होतो...

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

लेखणीच्या लक्ष जिभांनी

रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी  आभाळ विकायला काढले  तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्...