Friday, 11 September 2026

लेखणीच्या लक्ष जिभांनी

रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी 
आभाळ विकायला काढले 

तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या
रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्या जीवांनी 
काही वेळ याचाही आनंद घेतला
 
नंतर जे ते आपल्या कोषात रममाण झाले..

भूमिका बदलायला पाहिजेत
 
क्रांतीवर खुडुक साहित्य लिहिणाऱ्याचेही 
रक्त वाहायला हवे

त्याच्या वाट्याचं सुखमौनी आभाळ 
विद्रोह्यांच्या वाट्यास आले पाहिजे

मग कवितेस तलवारीची तेजतर्रार धार येईल
आणि लेखणीच्या लक्ष जिभांनी विद्रोहाचा लाव्हा
 
आंदोलनकर्त्यांचे नेभळं आभाळ पेटवून देईल!

- समीर गायकवाड

लेखणीच्या लक्ष जिभांनी

रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी  आभाळ विकायला काढले  तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्...