शहरातील बेघर भिकारी
रात्री रिकाम्या पोटी
धुळकट आडोशांना झोपी जातात.
दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात
रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे
म्हणून मनातल्या मनात दुवा मागतात...
भिकारी झोपी गेल्यानंतर तिथं चांदणं येतं,

त्यांच्या उशाला बसून कासावीस होतं..
रात्रीस आजकाल आभाळ निव्वळ निरभ्र दिसतं
कारण माझ्या वाट्याचं चांदणं विरतंय
शहरांतला काळोख रात्रभर रस्त्यांवर भटकत असतो
त्याचाही शोध तोच आहे जो माझा आहे...
- समीर गायकवाड
https://www.facebook.com/sameerbapu1/videos/524596562072041
या म्युझिक व्हिडिओत शहरातील रस्त्यावर रात्रीस कुठेही झोपणाऱ्या एका बेघर भिकारी व्यक्तीची लाईफस्टोरी आहे. त्याची आणि त्याच्या जीवलगांची पुन्हा भेट होते की नाही हे रंजक पद्धतीने पेश केलंय...
इंग्रजीचे ज्ञान अगदी त्रोटक असूनही आणि खिशाला परवडत नसताना देखील बेस्ट ग्रॅमी विनर्सच्या कॅसेट्स घरी आणायचो. त्यातलीच एक होती 'बट सिरीयसली' ही ऑडिओ कॅसेट. फिल कॉलिन्सची गाणी यात होती. यातलं 'जस्ट अनदर डे इन पॅरॅडाईज...' हे गाणं खूप आवडलेलं. गाणं आवडणं वेगळं आणि त्याचा आशय नेमक्या पद्धतीने कळणं वेगळं. अर्थात तेंव्हा उमरही नव्हती आणि समज तर नव्हतीच नव्हती.
कॉलिन्सचं हे गाणं बेघर आणि गरजू लोकांच्या मनातले भाव नेमक्या शब्दात मांडते. यासाठी १९९१ सालचे रेकॉर्ड ऑफ द इयर ग्रॅमी अवार्ड कॉलिन्सला मिळाले होते. वाद्यांचा कोलाहल न करता थेट भिडणाऱ्या सिम्पल शैलीत त्याची गाणी असत. पियानोचा परफेक्ट वापर करायचा तो. त्याच्या आवाजाचा टोन कधीच लाऊड वाटला नाही. अगदी सॉफ्ट. त्याच्या गाण्यात थिल्लरपणा नसायचा. नेमके आणि स्प्ष्ट असा सगळा मॅटर होता.
'जस्ट अनदर डे'चे गीतलेखन आणि गायन दोन्ही कॉलिन्सने केलंय. गाण्याच्या शेवटी तो ईश्वराला प्रश्न करतो की, कुणी कुणासाठी आणखी काही करू शकणार नाही असं होईल का ? याच्यावर तू काही भाष्य केलं पाहिजेस. ज्यांना एके जागी थांबू दिले जात नाही, कारण ते तिथे सूट होत नाहीत. त्यांची मदत कुणी करत नाही, त्यांना कुणी समजून घेत नाही, त्यांना कुणीच आपलं मानत नाही मात्र त्यांचा अपमान मात्र सर्वत्र होतो. खरे तर इथे कुणीच कायम असणार नाही. एक दोन दिवसात सगळ्यांचा प्रवास संपणार आहे. मग स्वर्ग असेल.'
या गाण्यामुळे सनातनी देशीवादी लोकांचे पित्त खवळलेलं. काहींनी कॉलिन्सचा उपहास करत म्हटलं की, 'तुझ्याकडे पैसा खूप झाल्याने तू पब्लिसिटी कॅच करण्यासाठी गरीबी आणि बेकारी दाखवतो आहेस.' यावर कॉलिन्सने उत्तर दिलेलं की, 'माझ्याकडे संपत्ती आहे याचा अर्थ मी असंवेदनशील झालो असा होत नाही.' बिलबर्ड लिस्टिंगला हे गाणं टॉपला जाण्याआधी कैक शहरातील बेघर आणि भिकारी व्यक्तींची कॉलिन्सने भेट घेतली होती.
आजच्या काळात त्याच्या 'जस्ट अनादर डे...' ला आता जगभरातील निर्वासितांच्या आवाजाचे स्थान प्राप्त झालेय. याच गाण्याचा हा व्हिडिओ मध्यंतरी खूप शेअर केला गेला होता. आजच्या मेमरीत हे सापडलं आणि स्वतःचं छप्पर नसणाऱ्या कित्येकींचे चेहरे डोळ्यापुढे तरळून गेले.
आपली आवड अगदी सही होती याचा आनंद वेगळाच असतो, नाही का ?

No comments:
Post a Comment