लोकहो पाण्यातून जरा लक्षपूर्वक चाला,
पुराच्या पाण्यासोबत गावाकडच्या निष्पाप जिवांची अधुरी स्वप्नेही वाहत येताहेत,
मदतीच्या आशेने एखादे स्वप्न घट्ट बिलगेल तुमच्या पावलांना.
क्षणभर तरी, त्याला उराशी कवटाळून घ्या,
त्याचं सांत्वन करा, त्याच्याशी बोला
मग, तुमचं काळीज डोळ्यांतून वाहू लागेल!
- समीर गायकवाड
