Monday, 24 April 2017

दरवळ

सकाळी घराबाहेर पडताना दाराशी लगटून उभी असलेली सजनी 
सस्मित वदनाने हात हलवते 
त्यासरशी अंगणातील पारिजातक मोहरून जातो, 
जास्वंदीचे गाल अधिकच लालबुंद होतात,
मोगरा शहारून उठतो अन 
लाजून चुर झालेल्या लालपिवळ्या कर्दळीं एकमेकीस मिठी मारतात,
परसदारातून डोकावून पाहणाऱ्या जाईची देठं नाजूक थरथरतात,
फुलांच्या गंधमैफलीत सामील होत उत्तरादाखल मी ही हात हलवून सायोनारा म्हणतो.. 
तशी तिच्या गालावर खळी खुलते
रोज सकाळी आमच्याकडं फुलं ही अशी थुईथुई नाचत असतात.

मनाच्या गाभाऱ्यात मान वेळावून बसलेला ध्यानस्थ औदुंबर मग अल्वार मंद स्मित करतो. 
दिवसभरात कुठेही गेलो तरी फुलांचा हा रम्य दरवळ माझ्या सोबत घुमत राहतो.... 

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...