काजव्यांची गर्दी दारी तुझ्या असली तरी,
तारांगण उद्याचे माझेच असणार
आहे.
सूर तुझे जरी लागले खास असतील
तरी,
मुक्त बंदिशी उद्याच्या मीच
गाणार आहे.
तोरणे फुलांची लागली तुझ्या
घरी तरी,
बाग फुलांचा उद्या माझाच असणार
आहे...
रचून घे कवने खोट्या शब्दांची
किती तरी,
शब्दांना वेसण उद्या मीच घालणार
आहे.
कैफ वाऱ्याचा साजरा कर भरभरून
उरी,
दिशा वादळाची उद्या मीच बदलणार
आहे.
दुःखाच्या डागण्या मला खुशाल
दे परी,
येणारा काळ हसणार तुझ्यावर आहे !!
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment