Wednesday, 24 April 2019

स्वप्न...


विस्तवात चुलीच्या तेवता स्वप्न तलम 

चंद्रात भाकरीच्या झिरपते अलगद मन.

परातीतल्या पिठात ओघळतो नितळ काळ,

मायेच्या पीठभरल्या हाती हरपते भूक.
शाडू रंगल्या भिंती जणू जरीचा पदर,
चंद्रमौळी छपराला देती भुईतून आधार.

कवडशात तिथल्या पाझरे सारेच हे सुख,

शेण सारवल्या भुईची मऊ किती मखमल,
टेकताच पाठ जणू फिरे मायेचाच हात.
डोळ्याच्या ओलीतून मायची छबी नाही जात..

येई परत फिरूनी जीव माझा रे तिथं,

एकुलत्या खोलीच्या संसारात जीव रमतो जिथं
सारी सुखं नांदती जुन्या आठवणीसंगं तिथं

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कलेवर..

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे कलेवर गावकऱ्यांनी लिंबाच्या झाडावरून उतरवलेय खरे, मात्र तरीही त्याच बांधावर, त्याच झाडावर, त्याच फांदीवर शेतक...