
निळ्या छतावर होई आभाळाची नक्षी,
दूर रानात चाले गायवासरांची कुक्षी
कधी येई उन्हाचं बेभानं आरमार,
कधी दाटे श्याम मेघांचं घरदार!
पिले घरटयात बसती उघडून चोची,
दूर उडून जाता माय सानुल्या पिलांची
भेगाळल्या भुईला वाटे तणाचाही भार,
निभावूनी सदा नेई विठूचा आधार!
हिरवाई उलीशी अजूनही आहे जिती,
मुक्या जीवांची तिच खरी साथी
पडती अलगद मोडक्या संसाराची पालं,
आज इथं उद्या तिथं हेच चालं
जरी कितीबी आक्रीत माणूस करी,
अंती भुईच त्याला उराशी गच्च धरी!
आभाळमाया मागे ठेवूनी जाई ईहलोकी
विलीनती देहतत्वे मातीच्याच पोटी!
अंती भुईच त्याला उराशी गच्च धरी!
आभाळमाया मागे ठेवूनी जाई ईहलोकी
विलीनती देहतत्वे मातीच्याच पोटी!
No comments:
Post a Comment