Wednesday, 8 May 2019

तुझ्या कोयरी डोळ्यांत..


घरंगळलं आभाळं तुझ्या कोयरी डोळ्यांत
मनं खिल्लारं धावून गेलं चौखूर दिशांत
गोंदण दंडाचं दिसतां उडती कारंजी काळजात
हसली पाखरं खुदकन जुंधळ्याच्या ऐन्यात
हरखली माती हळद पावलांच्या स्पर्शात  
भर उन्हातलं लागिरं पारंब्याच्या सावल्यात
रान झपाटलं तुझ्या चंदनगंधी गं देहात
गाभुळलं उन्हं झुलता कायेच्या पारंब्यात 
उधाणल्या अंगातला घुमं पारवा जोरात
झाडं गेली लाजून, 
वेली रंगल्या झिम्म्यात   
उभं शिवारं डुलतंया प्रेमाच्या गं तालात...

घरंगळलं आभा
ळं तुझ्या कोयरी डोळ्यात....


- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...