झाडांच्या हिरव्या डहाळीत सुर्य घेई वामकुक्षी
रस्त्यावर अलगद डुलते सावलीची नक्षी
श्रमलेले जीव थांबताच तिथे जागे होत पक्षी
जित्राबांच्या पायी होता मातीचे आलिंगन
कोकीळ कवी करतसे शीतल मुग्ध गायन
फांद्या फांद्यातून नाचे अधीर उन्मुक्त पवन
चैत्र पालवीची चाहूल देई पाखराना आवतण
सावली करे वाटसरूवर मायेची कोवळी पाखरण
दूर बहिणीच्या डोळा येई माझ्या कष्टांचे झिरपण
मायबाप म्हणजेच जन्माची सावली
पूजिता त्यांना नलगे उन्हाची काहिली
ऋणे त्यांची जणू वृक्षवल्ली कैवल्याची…
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment