वारच करायचे होते तर मूक रहावयाचे नव्हते
कोट छातीचा केला असता, स्मित ओठी झळकले असते !
घरच सोडायचे होते तर पत्ते दयावयाचे नव्हते
खेळ रस्त्यांचा केला असता, ठसे मनात उमटले असते !
चालच करायची होती तर कधी लपवावयाचे नव्हते
ताण डोळ्यांना दिला असता, बिंब मनात उतरले असते !
वचने मोडायचीच होती तर शब्द फुलवायचे नव्हते
छंद जीवाला लावला असता, मोल शपथेस राहिले असते !
धोकेच दयायचे होते तर स्वप्न रंगवावयाचे नव्हते
खोट्या आशेवर जगलो असतो, अर्थ नात्यांना राहिले असते !
- समीर गायकवाड
No comments:
Post a Comment