Wednesday, 8 May 2019

संचित



किरणे कोवळी येता रामप्रहरी वस्तीत, फुरफुरली मायच्या थकल्या पायापाशी.  
खिडकीतली चिमणी हसली खुदकन, उडाली काडी घरटयाची वाऱ्यावर चोचीतून.
जागवली गाढ झोपलेली इवलीशी कोवळी पाने, दूर देवळातल्या काकडयाच्या स्वराने
स्वागतासाठी सकाळच्या, टाळ्या पाकळ्यांनी वाजवताना धांदल फुलांची की उडाली. 
बिलगली वासरे मखमली अलगद, चंद्रमौळी गोठयातल्या कपिलेच्या गच्च कासेला .  
उमटली नक्षी देखणी त्रिकोणी थव्याची, सुबक लाल आभाळी चिवचिवत्या पाखरांची 
तान जांभईची कशी सुरेख बघ दिली, विहिरीतल्या पारव्याने अंग अलवार झटकुनी 
शेत शिवारातून बागडत गाणं मातीचं गाताना, सकाळ सुभगाची आनंदरंगात न्हाली.
देखता कुण्या जन्माचं रे हे संचित, सोळा शृंगाराने सृष्टी कशी बघ रोज नटली !

- समीर गायकवाड. 

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...