Wednesday, 8 May 2019

वियोग ...



वाट तुझी पाहताना दिवस थकून जातो,

अंधारून येताना गल्बललेल्या क्षितिजाची गळाभेट घेतो.

सांजेस कलताना सूर्य उदासुनि भंजाळतो,

करपल्या आभाळात पळसरंगी वियोगचित्र आरेखतो

थकल्या पक्षांचे थवे कवेत घेऊनी जातो,

मावळतीच्या मृदू अधरावरती तप्तमस्तिष्काला शमवितो

सावल्यांना घनंधराच्या क्षीण कुरवाळतो,

प्रतिक्षेचे आर्त साठवूनी काळजात अस्तास दिवस जातो.

बुडताच बिंब येतेस तू अंधारकाठावरी,

पाहण्या तुझ्या विरहाश्रूंना नभांगणी चंद्र उगवतो !

 

समीर. 

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...