काचबिंदी नभ तुझं उतरलं डोळ्यात
सोनकेळीच्या पानात हळदउन्हं तरारलं
बिलोरी चोळीच्या मागं गोंदण चकाकलं
माझं काळीज कसं गं तू अवचित चोरलं !
पायवाटंनं वाजं तुझं मखमली पाऊल
पैंजणाच्या संगीतानं शिवार थरथरलं
चंदेरी जोडव्यांत गाणं पाऊलवाटेचं हरवलं
माझं चाफाचांदणं कसं गं तू अल्गद हेरलं !
किनखापी रूप तुझं झिरपलं देहात
नक्षीदार कशिदयानं वावरास झपाटलं
लाल्बुंद कुंकवात वरदान देवाचं उतरलं
तुझं येणं असं कसं गं, जणू मोरपीस फिरलं !!
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment