झुले चिंचेखाली झोळी, निजे आनंदे सानुली
रुणुझुणू गाई वारा, फुले नाजूक डोलती शिवारा
दंगता कृष्णमेघ सावळे, बिलोरी नभ भोवळे
सावल्यांचे उंच हिंदोळे, जाती भुरळूनि डोळे
डुले पानांची अल्वार नक्षी, झिंगूनि जाय पक्षी
गिरकी घेऊनि पान आल्हाद, झेप झोळीमधे घेई
छाती बुंध्याची येई फुलून, झाड जाई हरखून !
पाहे पांडुरंग कौतुके फांद्यातूनी चित्त दंग होऊनी
दिस वैरी येता डोईवरी, छकुली भुके होई बावरी
माय अर्धपोटी गाई अंगाई, बाळासंगे शिवार झोपी जाई...
No comments:
Post a Comment