आडवळणी वाटंनं घुमं घुंगरमाळांचं
गाणं
उसाच्या फडात नाचं हिरवंपिवळं चांदणं !
चिलारीच्या काट्यापाशी सरडा घेतो पेंग
उफाणल्या मातीला छळं भुईमुगाची शेंग !
वारा जाता गांगरून त्याची होई वावटळ
वाकता आभाळ डोंगराच्या छाती येई कळ !
पानोपानी लकाकती ऐने बिल्लोरी चित्तचोर
किती लपशी आता जीवा लागला की गं घोर !
मन अधीर सांगे वारंवार वाटंच्या रं वाटसरा
इथं चकवा सारा नको लावू जीव दिलबरा !
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment