Wednesday, 8 May 2019

वियोग २

गंध तिचा बांधावरच्या मातीतला अलवार खुणावतो,
केकताडात वाढलेला चाफा तेंव्हा पाकळ्यातून हसतो !  

गहिवर तिच्या आठवणींचा वातीत समईच्या पाझरतो
देव्हाऱ्यातला देवही तेंव्हा निर्माल्यात डोळे लपवतो !    

चाहूल तिच्या येण्याची घेऊन वारा घरभर हुंदडतो
जीर्ण झालेल्या खिडक्यात तेंव्हा बर्फ नजरेचा होतो !

कढ तिच्या वेदनास्मृतीचे पिऊनि अस्तास सूर्य जातो,
स्वप्नातल्या गावात पाऊस वियोगाश्रूंचा कोसळतो.....    

No comments:

Post a Comment

लेखणीच्या लक्ष जिभांनी

रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी  आभाळ विकायला काढले  तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्...