Wednesday, 8 May 2019

सरसोती

लहान बहिणीला सांभाळून आपलं कुटुंब चालवून स्वतःचे शिक्षण करायचे हे दिव्यच आहे ते पार पाडणारया एका मुलीची कविता ...
आई वडील कामाला गेल्यानंतर लहानग्या बहिणीबरोबर थोडा वेळ शाळा, थोडं काम आणि दिवस डोईवर आल्यावर थोडं सरपण गोळा करून झाल्यावर पोटासाठीचे दोन घास चुलीवर शिजवताना तिचा निम्मा दिवस जातो. सांज येण्या आधी मायबाप घरी येतात आणि चिमुरडीस कोण आनंद होतो ! जणू दिवाळीच !!
त्याचे वर्णन करणारी ही कविता गावजीवनातील कुमारिकेचे स्थान दर्शवते..


दिवाळी -
माय गेली खुरपाया, बाप गेला कोळपाया
मी जाते शाळेमंदी, संगत भईन सरसोती
सुर्व्यादेव उगवताच, ओस पडे माजी खोपटी
रातीच्या शिळ्याचे, मिठ्ठास घास पोटी

नशीब गेले झोपाया, प्लालब्ध गेले लया
मी वाचते आविक्ष, संगे भईन सरसोती
दिस येऊनि माथ्यावरी, दुध नसे ओठी
तांदळाच्या पेजेचे, ओढाळ थेंब तिच्या पोटी

पाठ लागते दुखाया, भूक लागते ओरडाया
मी वेचते जळण, संगे भईन सरसोती
चूल पेटे धडाडूनि, काजळी लागे लल्लाटी
सप्नी बगत मायेला, चोखे मधाळ मुठी

मायबाप येता माघारी, सरसोतीची दिवाळी !    

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...