कर्दमल्या सांजेत कुंद पाऊस उतरला देहात
पानओल्या वेलींना वारा मिठी मारतो डोहात
झाडे कुसुंबी किनखापी लाजून झुकवित माना
घरटयातल्या पिलांची चिवचिव येई जोशात
पंखभिजल्या कोकीळेच्या हळूच घुमती ताना
थेंबाचे स्पर्श चेतून ओघळती फुलांच्या देठात
ओलेत्या अंगात नाचतो वेडावून पाऊस फणा
थरथरत्या कायेचे सांगावे नुरती बंद ओठात
पर्जन्यवेडया मातीत उतरती नभांच्या खुणा
कर्दमली सांज कुंद पेटवते पाऊस चिंब देहात !
- समीर गायकवाड
No comments:
Post a Comment