आठवणींनी तुझ्या चिंब, आसवात भिजल्या रात्री किती
सूर सतारीच्या काळजातले, आणिक जपायाचे तरी किती ?
तू गेलीस उधळूनी अल्वार, खेळ अंतरीच्या भावनांचा
आठवणींची तुझ्या बकुळफुले, सांग वेचायची तरी किती ?
तू मांडलीस जगभरात आरास, भग्न स्वप्नांची माझ्या
भासांनी तुझ्या बेचैन होत, रात्री जागवायच्या तरी किती ?
तू रचुनी देखावा उत्कट प्रेमाचा, केलास तमाशा माझा
नावाची तुझ्या अनिवार, ओढायची जपमाळ तरी किती ?
तू जाणलेस
कधी न मोल शपथांचे, घात वचनांनी केलास
काजळमायेत
आणाभाकांच्या, अजून गुंतायचे तरी किती ?
उलगडले असतेस जरी, अंतरंग मनीचे सहज तू कधी
मिळाले असते उत्तर मजला, आणिक जगायचे तरी किती ?
No comments:
Post a Comment