Wednesday, 8 May 2019

दगा ..


भाल्यांच्या टोकदार पात्यांना मी आपलेसे केले
तेव्हा त्यांनीच लवून कुर्निसात मला केले.
आपुल्याच माणसांच्या हाती शस्त्र माझे दिले,
तेव्हा पाठीवरती वार आधी त्यांनीच केले!

निद्रिस्त आत्म्यास जेव्हा आवाहन बंडाचे केले
त्यानेच तेव्हा मला सफेद निशाण दाखवले.
ओंजळीत आकाशाच्या मळभ मनातले रिते केले
अन् गारदी नभातले घरात अलगद उतरले!

व्यथा सांगण्या माझी कोणासही वर्ज्य ना केले
निरोप घेता कळले ते बहिरे ठार निघाले .
आपले म्हणून ज्यांच्या अधरी मस्तक टेकवले
ते निखालस गळेकापू निष्णात निघाले!

घातक्यांच्या दुनियेत जेव्हा मूक राहण्याचे ठरवले
तेव्हा ओठांनीच दगा करून मज बाजारात उभे केले!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...