तू परतून कधी आली नाहीस म्हणून
काय झाले ?
तू आहेस माझ्या रोमारोमात
नसानसातून वाहणा-या उष्ण रक्ताच्या
गतिमान प्रवाहात.
गहिऱ्या स्पर्शाच्या तरल संवेदनेत.
स्मृतींच्या चैत्रबनात, वर्तमानाच्या ग्रीष्मबंधात तू आहेस
आणि भविष्याच्या शिशिरागमनातही
तूच असशील.
माझ्या अस्तित्वाच्या चैतन्यकळांत
तुझं असणं सामील आहे.
झुरणारा हरेक श्वास आणि
काळीजकुपीतल्या वातींच्या
ज्योतीही जळतात तुझ्यासाठी.
अपराधाचा इतका कबूली जबाब पुरेसा आहे, नाही का
?
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment