Wednesday 8 May 2019

सरण



वेचता जळण वैराण मनातले, सरपण देहाचे झाले कधी काही कळलेच नाही,

जाताना अनवाणी उदास कशी पावले सजवली काट्यांनी, समजलेच नाही.


झिजता दुनियेसाठी, पारा कायेतला उडत कधी गेला काही कळलेच नाही,

गाताना विराणी भकास कसे आळवले हुंदके कंठी, समजलेच नाही.


राबता घरादारासाठी, चांदवे स्वप्नांचे हरवून कुठे गेले काही कळलेच नाही,

घेता इतरांचा ध्यास कसे गोंजारले आर्त उमाळे, समजलेच नाही

 

रडता गोतावळ्यासाठी, घनव्याकुळ वेदना मुकी झाली कशी कळलेच नाही,

मोजता शुष्क श्वास कसे उसवले जीर्ण आयुष्य, समजलेच नाही


वेचता जळण वैराण मनातले, सरण माझेच रचले कसे काही कळलेच नाही.

ऐकता कैफियती खास कसे फसवले अंतरीच्या गझलेस, समजलेच नाही...

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...