गावात सोनवर्खी पानाफुलांच्या, रंगे पंगत उन्हाची
हळदगाणं केशरमातीचं, गुंजे सुकल्या शेत शिवारी
देठ हिरवं मातीच्या कुशीतलं, हसे खुदकन गाली
स्वप्न हिरवाईचे घाले, रुंजी रुक्ष ओसाड माळरानी
गोंदवून रखरखीत वैशाख, नितळ कमनीय अंगी
साद घाले अलवार देही, घायाळ पळसपानांतुनि
पानां स्वप्न पडता दवाचे, रूजे पाऊसगाणी उन्ही!

No comments:
Post a Comment