Wednesday, 8 May 2019

एक होतं पाणी


एक होतं पाणी, तवा येई आभाळातुनी 
काळ्या ढगांत लख्ख ईजा
झाडाझाडाला मारती मिठया
पत्रा वस्तीवरला वाजं तडातडा
झऱ्याला भरं पाण्याचा घडा  

येई आता पाणी वल्या डोळ्यातुनी
खोल ड्वळ्यात मुक्या ईजा
झाडाझाडाच्या व्हती काटक्या
पत्रा गोठयावरला तापं कडाकडा
आटं मातीतला पाण्याचा झरा

पाणी येईना आता नितनेमानी  
गायवासरांच्या डोळी भेगा
वाड्यावस्त्यांच्या चिंधडया
भुईवरचा यम नाचे थयथया
भरे घडा माणसाच्या पापाचा 

एक होतं पाणी, तवा येई आभाळातुनी 
आता येई चराचराच्या रक्तामधुनी!

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...