दोषावे का शस्त्राला, जेंव्हा सुरा आपल्यांनी दिला ?
रडावे कसे आज मी, जेंव्हा पोबारा अश्रूंनी केला
मिटावे का डोळ्यांनी, जेंव्हा दगा पापण्यांनी दिला ?
शोधिता खुणां तेंव्हा, कळे डाव पावसाने साधला
बोलावे का खुणांना, जेंव्हा दगा आठवणींनी दिला ?
शोधू कसे गर्दीत तुला, जेंव्हा धीर नजरेने सोडला
पांगावे का गर्दीने जेंव्हा, सांगावा डोळ्यांनी दिला ?
गाव ओस झाले जेंव्हा, चितेस माझ्या अग्नी दिला
विझवावे का चितेला, जेंव्हा दिलासा ज्वालांनी दिला ?
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment