Tuesday, 7 May 2019

फुलांचे गाव

फुलांचे गाव तू सोडून गेलीस अन तिथला गंध नाहीसा झालाय,
कालच वाऱ्याने तुझ्या नव्या घराचा सुगंधी पत्ता दिलाय
स्मृतीकुपीतला कस्तुरीगंध त्या सांगाव्याने तरारून गेलाय
निरोप माझ्या येण्याचा चकोराच्या पंखी नुकताच गोंदवलाय
अंगणातल्या प्राजक्तफुलांत तुझ्या त्याचाच फुलोरा आलाय

- समीर गायकवाड 

No comments:

Post a Comment

लेखणीच्या लक्ष जिभांनी

रोजच्या सवयीने इकडे साहित्यिकांनी  आभाळ विकायला काढले  तिकडे आंदोलनकर्त्यांनी रक्त मांसाच्या समिधा केल्या रोज त्याच त्या गमजा बघून वैतागलेल्...